कळवण : कळवण- बेज रस्त्यावर किसान वस्तीजवळ लखमापूर येथील महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या अल्टो गाडीने चिंचेच्या झाडाला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.लखमापूर येथून महेश राजेंद्र गायकवाड (३४, रा. लखमापूर), जगदीश खंडू शिरोळे (२२, रा. धांद्रीपाडा), भूषण मल्हार शेवाळे (२७, रा. टेहरे), संदीप प्रतापराव कदम (३४, रा. निंबोळा, देवळा), सुशांत नानाजी बोरसे (२२, रा. वरहाणे) व पवन नानाजी अहिरे (३० रा. लखमापूर) हे अल्टो कारने (क्र. एमएच ४१ व्ही ९३२८) सटाण्याकडून बेज मार्गाने कळवणला जात होते. बेज फाट्याजवळ भरधाव जात असताना चिंचेच्या झाडाला कार धडकल्याने यात महेश गायकवाड हे जागीच ठार झाले, तर जगदीश शिरोळे हे गंभीर जखमी आहेत. भूषण शेवाळे, संदीप कदम, सुशांत बोरसे व पवन अहिरे यांना मार लागला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 22:49 IST
कळवण : कळवण- बेज रस्त्यावर किसान वस्तीजवळ लखमापूर येथील महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या अल्टो गाडीने चिंचेच्या झाडाला धडक दिली. या ...
महावितरण कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्देबेजजवळ घटना : एक ठार, पाच जण जखमी