शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिंगवेत शालेय व्हॅनला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:09 IST

चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात कांचन सुधा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन शनिवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देतीन विद्यार्थी गंभीर जखमी । पंचनाम्यापूर्वीच व्हॅन हटवल्याने पालक संतप्त

मनमाड/दरेगाव : चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात कांचन सुधा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन शनिवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर सदर व्हॅन पंचनामा होण्यापूर्वीच तेथून शाळेत नेऊन ठेवत ताडपत्रीने झाकून ठेवल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.मनमाड शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर लासलगाव मार्गावर कांचन सुधा इन्स्टिट्यूटची शाळा असून, त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. नर्सरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन जात असताना चांदवड रोडवर ती उलटली. व्हॅनने तीनदा पलटी खात ती रस्त्यालगत असलेल्या कांद्याच्या वखारीजवळ जाऊन उलटली. या अपघातामुळे व्हॅनमध्ये असलेल्या चिमुकल्यांच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना वाहनातून बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अथर्व हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉ. शांंताराम कातकडे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले. मात्र स्मित उबाळे, यश मंडल आणि अथर्व खैरनार या तिघांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथेपाठवले. या वाहनात एकूण २५ विद्यार्थी होते. पालकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.दरम्यान अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन तातडीने घटनास्थळा वरून हलवण्यात आल्याचे कळताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.फोटो- ०१ मनमाड स्कूल बस या नावाने सेव्ह.जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलेल्या अथर्व हॉस्पिटलबाहेर पालकांनी केलेली गर्दी.तरप्रकरण दडपण्याचा आरोपअपघातानंतर पोलीस येण्यापूर्वीच सदर वाहन घटनास्थळावरून हलवून शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. अपघाताचा पंचनामा होणे गरजेचे असताना वाहन घटनास्थळावरून हलविण्यात आल्यामुळे एका प्रकारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक व पालकांनी केला. एका वाहनाची आसनव्यवस्था केवळ दहा सीटची असताना व्हॅनमधून २५ जणांना दाबून भरून वाहतूक केली जात असल्याबद्दलही पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालकांची तक्र ार दाखल नसल्याचे चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सांगितले.शाळा प्रशासनाला निवेदनशालेय व्हॅनला झालेल्या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावणाºया बेजबाबदार विद्यार्थी वाहतुकीबद्दल शाळा प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी मनमाड शहर रिपाइंचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राजेंद्र अहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन यांची नावे आहेत.

टॅग्स :Accidentअपघात