शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मंचर शिवारात अपघात; जिल्ह्यातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:44 IST

दिंडोरी : नाशिक-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश सोनवणे यांच्यासह त्यांचे जावई व बबन तिडके ठार झाले.

ठळक मुद्देकार आली असता रस्त्यावर कुत्रे आडवे आलेमोबाईलच्या प्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले

दिंडोरी : नाशिक-पुणे महामार्गावर मंचर शिवारात झालेल्या कार अपघातात खेडगाव येथील शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश सोनवणे यांच्यासह त्यांचे जावई व पोलीस हवालदार बबन तिडके ठार झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. पुणे येथे भाचीला आणण्यासाठी ते गेले होते. तेथील कामे उरकून आय२० कार (क्र मांक एमएच १५ ५१५१) मधून रमेश नामदेव सोनवणे (५८) हे त्यांचे नातेवाईक पोलीस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके (५२) राहणार कसबे सुकेणे ता. निफाड, निवृत्ती बाबुराव काश्मिरे (५४) रा. सातपूर नाशिक, ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (५२) रा. आंबेदिंडोरी ता. दिंडोरी हे नाशिककडे येत होते. पुणे-नाशिक रस्त्यावर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तांबडेमळा-भोरवाडी येथे आय 20 कार आली असता रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी चालक रमेश सोनवणे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्यालगतचा डिव्हाईडर आणि लोखंडी बोर्ड तोडून बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यावेळी गाडी एका झाडाला अडकली. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेवून जाणारे शिवप्रेमी यांनी मोबाईलच्या प्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. जखमींना मंचर उपजिल्हा रूग्णालयात नेले असता अपघातातील रमेश सोनवणे, बबन तिडके यांचे वैद्यकीय तपासणीपूर्वीच निधन झाले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मृत रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी बबन तिडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोनवणे यांचा पार्थिवावर सायंकाळी खेडगांव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अपघातातील जखमींवर नाशिक येथे खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.