नाशिकरोड : राजस्थानी महिला मंडळ नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या संस्थापक शर्मिला संचेती, अरुणा लढ्ढा, शिवमाला चांडक उपस्थित होत्या.यावेळी मावळते अध्यक्ष हेमा कटारिया यांच्याकडून अनिता अग्रवाल यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. तसेच उपाध्यक्ष निलू खिवंसरा, सचिव दक्षा बोरा, खजिनदार डॉ. रेश्मी चोपडा, सहसचिव विद्या साखला, कार्यकारिणी सदस्य अंजली अग्रवाल, अलका राठी, पद्मा राठी, पूनम राठी, सरोज डागा, राखी पारख, अनुभा खेतान यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सदस्य उपस्थित होत्या.
राजस्थानी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:12 IST