शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाडळदेत बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:59 IST

पाडळदे : ग्रामीण भागातही कोरोनाची प्रचंड दहशत असून, संचारबंदी काळात कुणीही घराबाहेर पडताना दिसत नाही. मात्र शेतीच्या कामासाठी काही लोकांना घराबाहेर पडावे भाग आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायमचा नष्ट व्हावा यासाठी मंगल कामना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाडळदे : ग्रामीण भागातही कोरोनाची प्रचंड दहशत असून, संचारबंदी काळात कुणीही घराबाहेर पडताना दिसत नाही. मात्र शेतीच्या कामासाठी काही लोकांना घराबाहेर पडावे भाग आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता सर्व पाडळदेवासीयांनी दिवे, पणती, मेणबत्ती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व गावातील नागरिकांनी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून घराच्या ओट्यावर बसून पणत्या लावल्या व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायमचा नष्ट व्हावा यासाठी मंगल कामना केली.सध्या २१ दिवसाचं लॉकडाउन सुरू आहे. या काळात सर्व पाडळदेवासीयांनी तंतोतंत पालन करून हा प्रतिसाद दिला आहे. अधूनमधून गावात पोलिसांची वर्दळ चालू असते. दररोज पोलीस वेगवेगळ्या कारणाने गावात फेरफटका मारत असतात. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर निघत नाही. खेड्याची वस्ती असल्यामुळे व सर्व शेतकरी, नागरिक असल्यामुळे किरकोळ कामासाठी शेतीच्या कामासाठी घरातील एक किंवा दोन जण कामासाठी जात असतात; पण तेसुद्धा सर्व सामाजिक सुरक्षित अंतर ठेवण्याचे तंतोतंत पालन करत आहे. आपला कोणाला संपर्क होणार नाही व कोणाचा आपल्याला संपर्क होणार नाही ही काळजी घेत असतात. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना गावात फिरण्याची मुभा दिलेली नाही. अशा पद्धतीने गावांमध्ये संचारबंदीस पाठिंंबा दिला जात आहे.जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व गरजेचे लागणारे सामान एवढीच दुकाने ठरावीक वेळेसाठी उघडी असतात. इतर वेळी रस्त्यावर शुकशुकाट जाणवतो.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या