पांडाणे : निसर्ग चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने दिंडोरी तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना गती आली आहे.निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण व दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे बळीराजा मशागतीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे.मका, भुईमूग पेरणीला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्रात पेरणी केलेले पीक निरोगी असते असा समज असल्याने मृगाच्या पावसाची बळीराजा दरवर्षी वाट पाहत असतो. चक्रीवादळामुळे दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
दिंडोरी तालुक्यात शेती मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:57 IST