शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपने तोडले अभ्यासिकेचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:11 IST

महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली.

नाशिक : महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली.यावेळी अभाविपच्या आंदोलकांनी अभ्यासिका बंद करण्यावरून प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली, तसेच शहरातील अन्य ठिकाणांची वाचनालये व अभ्यासिका खुल्या करण्यासाठी अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा संदर्भ देत विविध संस्था, संघटनांना भाडेतत्त्वावर दिलेल्या मिळकती ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. यात करारनामा नसलेल्या, कराराची मुदत संपलेल्या तसेच नाममात्र भाडेतत्त्वावर मिळकत ताब्यात ठेवणाऱ्या संस्था, संघटनांकडून मिळकती खाली करून त्यांना सील लावण्याची कारवाई प्रशासनाने केल्याने शहरातील सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेने शहरातील विविध अभ्यासिकांना कुलूप लावल्याने ऐन परीक्षांच्या काळाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. ८) मनपा आयुक्तांची भेट घेत अभ्यासिका खुल्या करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, दोन दिवसांत महापालिकेतर्फे या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी (दि. ११) दुपारी २ वाजेच्या सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कुलूप तोडत अभ्यासिकेत प्रवेश केला. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, शहराध्यक्ष सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, शर्वरी अष्टपुत्रे, गौरी पवार आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसानमहापालिकेने शहरातील जवळपास तीनशे मिळकतींवर अशाच प्रकारे कारवाई करीत सील केल्या आहेत. यात जवळपास १७ ते १८ अभ्यासिकांचा समावेश असून, या अभ्यासिकांमध्ये जवळपास ५ ते ६ हजार विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, महापालिकेने या अभ्यासिकांनाच कुलूप ठोकल्याने ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासिकाचालकांकडे पुढील सहा महिन्यांचे शुल्क भरले आहे. असे असताना चालक आणि महापालिकेच्या भांडणात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे अभाविपने म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाlibraryवाचनालय