शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या अनुभवावरून सांगतो, मोदींना समर्थन करत असाल तर...; आदित्य ठाकरेंचं TDP आणि JDU आवाहन
2
"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."
3
"काश्मीरपेक्षा केरळमध्ये कार्यकर्त्यांवर अत्याचार, पण.."; 'एकमेव' खासदाराचे मोदींकडून कौतुक
4
"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला
5
एनडीएच्या बैठकीत मोदींनी पवन कल्याण यांचं केलं खास कौतुक, म्हणाले...
6
नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...
7
Paytm वर आली मोठी अपडेट, सर्किट लिमिटमध्ये बदल; शेअरवरही दिसला परिणाम
8
नितीश पायाला स्पर्श करू लागले, मोदींनी रोखलं, तरी...! चिराग यांचीही गळाभेट...; NDAच्या बैठकीत काय घडलं?
9
BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा
10
"नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार", चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला पाठिंबा
11
एक अनोखा योगायोग! करण सिंह ग्रोवरने सांगितलं लेकीचं नाव 'देवी' ठेवण्यामागचं कारण
12
“लोकसभा निकाल भाजपा-NDA विरोधात, नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करु नये, कारण...”: सचिन पायलट
13
"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर
14
"पुढच्या वेळी याल तेव्हा सगळेच..."; मोदींच्या नावाला समर्थन देत नितीश कुमारांची फटकेबाजी
15
"जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता जीवाचं रान करू’’, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास
16
मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट!
17
एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या उमेदवाराने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव, कोण आहेत ते? वाचा
18
“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत
19
राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; मानहानी प्रकरणात मिळाला जामीन
20
Mumbai weather update: मुंबईत मान्सूनचं आगमन केव्हा होणार? हवामान तज्ज्ञ काय म्हणाले?

दुर्लक्षामुळे लोहोणेरमध्ये अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:04 AM

लोहोणेर : गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावात विकासकामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून, गावात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. विकासकामे करावयाचे नसतील तर खुर्ची खाली करा अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या सदस्य धनश्री आहेर यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार यांची कानउघडणी केली.

ठळक मुद्देआरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा

लोहोणेर : गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावात विकासकामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून, गावात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. विकासकामे करावयाचे नसतील तर खुर्ची खाली करा अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या सदस्य धनश्री आहेर यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार यांची कानउघडणी केली.यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कल्पना देशमुख, प्रसाद देशमुख, समाधान महाजन, निबा धामणे, राकेश गुळेचा, योगेश पवार, आदींनी चर्चेत सहभाग घेत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभारा विषयी तक्रारी केल्या. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य यांना कळवूनही याबैठकीस हजर नसल्याने धनश्री आहेर यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. केदा आहेर, गटविकास अधिकारी महेश पाटील, विस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत, सतीष देशमुख, रमेश आहिरे, अशोक अलई, प्रकाश नेरकर, नाना जगताप, सोपान सोनवणे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान धनश्री आहेर यांनी लोहोणेर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रास भेट देऊन कामकाजा बाबत सूचना केल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, लोहोणेर प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. योगेश पवार आदीसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लोहोणेर प्राथमीक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या जागी नवीन कर्मचाºयांची त्वरीत नेमणूक करण्यात यावी अशी मागणी लोहोणेर ग्रामस्थांनी केली.लोहोणेर येथे स्वाइन फ्लू आजाराने राजेंद्र परदेशी या प्रगतिशील शेतकºयाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर धनश्री आहेर यांनी शनिवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.