शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फरार झालेला ‘तो’ रिक्षाचालक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:51 IST

एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प्रवाशाची रोकड व तब्बल ८ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाºया रिक्षाचालकास म्हसरूळ गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

पंचवटी : एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प्रवाशाची रोकड व तब्बल ८ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाºया रिक्षाचालकास म्हसरूळ गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी (दि.१९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली होती. याबाबत म्हसरूळ शिवारात राहणारे सतीश गुलाबराव निकम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली. निकम यांच्या पत्नी व अन्य नातेवाईक साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून रिक्षातून प्रवास करत दिंडोरीरोडवरील एका पेट्रोल पंपसमोर रस्त्यावर उतरले.त्यावेळी निकम यांच्या स्नुषा त्यांच्या दागिन्यांची पर्स रिक्षातच विसरल्या. रिक्षाचालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने निकम यांच्या हातातून प्रवासी दराची रक्कम हिसका देत घेतली. भरधाव रिक्षा घेऊन पर्ससह पोबारा केला. निकम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार सुरेश माळोदे, संजय राऊत, मंगेश दराडे, किशोर रोकडे, राजू टेमगर यांनी तत्काळ फरार रिक्षाचालकाचा हद्दीत शोध सुरू केला. यावेळी गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आडगाव चौफुलीवर सापळा रचला.  संशयित रिक्षाचालक रिक्षा (एमएच १५ एफयू २३२२) घेऊन चौफुलीवर आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. संशयित सुभाष हरलाल जाधव (३८, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षासह निकम यांची दागिन्यांसह रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. या गुन्ह्यात रिक्षा जप्त करण्यात आली आहे.‘बळीमहाराज’ शब्दावरून सुगावादिंडोरीरोडवर घडलेल्या घटनेदरम्यान निकम व त्यांच्या कुटुंबीयांनी रिक्षाचा क्रमांक बघितलेला नव्हता. रिक्षाच्या पाठीमागे हुडवर ‘बळीमहाराज’ असा शब्द वाचल्याचे त्यांच्या लक्षात राहिले. यावरून पोलिसांनी रिक्षाचा सुगावा लावला.

टॅग्स :Policeपोलिसauto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारी