ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - इगतपुरी येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीच्या आवारात कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांनी एक लाख बिसलरी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आजूबाजूच्या परिसरातून आणि कामगारांच्या घरातून एकत्र जमा केल्या. जमा केलेल्या बाटल्यांच्या माध्यमातून त्यांनी 20 फूट उंच मनोरा उभारला आहे. या मनोऱ्याचा शुक्रवारी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या मनोऱ्याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. यापूर्वी 46 हजार बाटल्यांचा आणि 13 फूट उंचीच्या मनोऱ्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. या भव्य मनोऱ्यामुळे पूर्वीचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्डची नोंद होणार आहे.