शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, महाप्रसाद, शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:52 IST

‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शनिवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नाशिक : ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शनिवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये पहाटेपासूनच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याेदयावेळी कीर्तनाची सांगता झाल्यानंतर हनुमान जन्मसोहळा पार पडला. उंटवाडीरोड येथील दक्षिणमुखी मारुती, त्र्यंबकरोड येथील वेदमंदिर, पंचवटीतील दुतोंड्या मारुती यांसह आगर टाकळी येथील मारुती देवस्थान, त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी डोंगरावरही हनुमान जयंती साजरी करण्यात आली.इंदिरानगरात उत्साहश्री पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटे महाअभिषेक, सकाळी हनुमान जन्मोत्सव व महाआरती, दुपारी सर्वरोगनिदान शिबिर व डॉक्टरांचा सल्ला, रक्तदान शिबिर, अवयवदान संकल्प (मानवता हेल्थ फाउंडेशन), दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. श्री हरी भजनी मंडळातर्फे भजनसंध्या झाली. बजरंग कॉलनीतील हनुमान मंदिर, तसेच साईनाथनगर महारुद्र कॉलनी यासह परिसरातील हनुमान मंदिरांत जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यकमांनी उत्साहात झाला.गंगापूररोड- ध्रुवनगरध्रुवनगर येथील दक्षिण हनुमान मंदिर येथे २४ मार्चपासून सुरू झालेल्या हरिनाम सप्ताहाची पुंडलिक महाराज पिंपळके यांच्या काल्याचे कीर्तनाने आज सांगता झाली. तसेच श्रमिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिरातही विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी स्थायी समिती सदस्य दिनकर पाटील, अमोल पाटील, नगरसेवक रवी धिवरे आदी उपस्थित होते.पंचवटी परिसरात जन्मोत्सवजुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म झाले. पहाटे महाअभिषेक करण्यात आल्यानंतर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अशोक झंवर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाआरतीनंतर दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी १०८ सामूहिक हनुमान चालिसा पठण, सुंदरकांड हवन तर दुपारी पूर्णाहुती करण्यात आली. सायंकाळी पुष्पांजली महिला मंडळाने संगीत सुंदरकांड पठण सादर केले. पंचमुखी हनुमान मंदिरात विविध आखाड्यांचे साधू, महंत तसेच भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. जुना आडगाव नाका बंजारामाता मंदिर येथील बालाजी मित्रमंडळाच्या वतीने तसेच पाथरवट लेन येथील सत्यबाल मित्रमंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आले. काट्यामारु ती मंदिरात महाआरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष्मणरेखा येथील श्री झुंड हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सायंकाळी परिसरातून हनुमान पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानी मंदीर येथून पालखी मिरवणूक काढण्यात आली. भगवतीनगर फ्रेंड सर्कल, हिरावाडीतील पेशवेकालीन हनुमान मंदिर, पेशवेकालीन मारुती मंदिर, सेवाकुंज येथील प्राचीन संकटमोचन हनुमान मंदिर, गजानन चौकातील मारुती मंदिर, हिरावाडी (भगवतीनगर) फ्रेंड सर्कलच्या वतीनेही हनुमान जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्टार फाउंडेशन, वरदविनायक मित्रमंडळ, शिवशाही ग्रुप, जिजाऊ प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.आगरटाकळी येथे पहाटे पूजनआगरटाकळी येथील राष्टÑसंत समर्थ रामदास स्वामी मठातील गोमेय हनुमान मंदिर व परिसरातील इतर हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्टÑसंत समर्थ रामदास स्वामी मठात शनिवारी पहाटे ६ वाजता देवस्थानचे अध्यक्ष व न्यायाधीश एस.टी. पान्डेय, आर्किटेक्ट प्रकाश पवार, सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, अ‍ॅड. भानुदास शौचे, आर.डी. आनेकर, सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते महाभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी ९ वाजता राजेंद्र मुळे यांचे देहातील हनुमानाचे स्थान या विषयावरील व्याख्यान होऊन दुपारी १२ वाजता आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पराग पांडव व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीत रामदासायन हा कार्यक्रम सादर केला. दुपारी ३ वाजता दिलीप भट सुयोग वाद्यवृंदाचा भक्तीपर गितांचा पार पडला. सायंकाळी मनिषा बाठे यांचे समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्यातील भक्तीयोग हा कार्यक्रम पार पडला. रात्री ऋतुजा नाशिककर, स्वराली जोगळेकर, नितीन जोगळेकर यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. गांधीनगर येथील महाबली हनुमान मंदिर, उपनगर येथील दक्षिणमुखी हनुमान, महारूद्र कॉलनीतील मारूती मंदिर, उपनगर मार्केटमधील हनुमान मंदिर आदि ठिकाणी अभिषेक, महाआरती हनुमान चालीसा पठण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिक