पेठ : तालुक्यात गत दोन दिवसाप्ाांसून भीज पावसाने संततधार कायम ठेवल्याने आड बुद्रूक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे छत रात्रीच्या सुमारास कोसळले. आड बुद्रूक येथे जिल्हा परिषदेच्या चार वर्गखोल्या असून, रविवारी रात्री संततधार पावसाने शाळेच्या कौलारू खोलीचे छत कोसळले. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. सुदैवाने रात्रीची वेळ व सोमवारी पोळ्याची शाळेला सुटीची असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी शालेय विद्यार्थ्यांवरचे मोठे संकट टळले आहे.
आड बु. प्राथमिक शाळेचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:59 IST