शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक!

By संजय पाठक | Updated: August 21, 2023 19:02 IST

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केली होती.

नाशिक-  हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष करत शेकडो भाविकांनी पहिल्या श्रावण सोमवार निमित्तरामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी कपालेश्वराच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

महादेवाचे मंदिर म्हटले की,  त्यासमोर नंदी असतोच मात्र नंदी नसलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. आज पहाटे कपालेश्वर मंदिरातील वंश परंपरागत गुरव अनिल भगवान आणि पुजारी वर्गाच्या उपस्थितीत महादेवाचे पूजन, अभिषेक करण्यात येऊन आरती करण्यात आली. पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी मंदिरात अभिषेक पूजन करण्यासाठी ब्रह्म वृंदांकडे गर्दी केली होती. 

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा विश्वस्त मंडळाने भाविकांना मुख्य प्रवेशदाराने महिला, पुरुष भाविकांच्या दोन रांगा करत दक्षिण व उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याची व्यवस्था केली होती तर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केली होती. सायंकाळी कपालेश्वराच्या मुखवट्याची स्वाती मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंदिराच्या परिसरात तसेच काळाराम मंदिर येथे भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच पुष्पदृष्टी करण्यात आली.