शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात!

By अझहर शेख | Updated: May 3, 2023 22:38 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिताफीने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले.

नाशिक : अंगात खाकी वर्दी अन् कमरेला सरकारी रिव्हॉल्वर लावून  सहायक पोलिस निरीक्षक संशयित सागर गंगाराम डगळे (३८) याने सात हजार रुपयांची लाच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात स्वीकारली. यावेळी संशयित लाचखोर पोलिस अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिताफीने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले.

गुन्ह्याच्या तपासाकरिता पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहन व जेवण खर्चासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी डगळे यांनी केली होती. तडजोडअंती सात हजार रुपयांची लाच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बुधवारी (दि.३) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून त्यांनी स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरुड यांच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठ वालावलकर यांच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात साध्या गणवेशातील पोलिसांनी अचानकपणे खाकी वर्दीतील पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेत सरकारी वाहनाकडे घेऊन जाताना बघ्यांची गर्दी झाली होती. या कारवाईने संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली.वर्षभरापूर्वीच मिळाली पदोन्नती!संशयित डगळे यांना गेल्यावर्षीच सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीतसुद्धा डगळे यांचे नाव आले होते; मात्र नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने ते उपनगर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते.

टॅग्स :Nashikनाशिक