शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला कोविडमुळे वैधव्य आलेल्या महिलांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 23:48 IST

त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणारे तोंड याबाबत जाणून घेण्यासाठी या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश होता.

ठळक मुद्देमिशन वात्सल्य : शासकीय योजनांची दिली माहिती

त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणारे तोंड याबाबत जाणून घेण्यासाठी या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश होता.त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत मिशन वात्सल्यअंतर्गत विधवा महिला आणि एक पालक गमावलेल्या बालकांसाठी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती भारती गेजगे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी श्रीमती दीपाली रामदास खेडकर, तहसीलदार दीपक गिरासे, गट शिक्षणाधिकारी अनिल शहारे, पंचायत समिती कृषी अधिकारी विटनोर, सहायक गट विकास अधिकारी गोपाल पाठक आदींसह अंगणवाडी सेविका आशासेविका उपस्थित होते. तसेच विधवा महिलांना अद्याप कोणते लाभ प्राप्त झालेले नाहीत, त्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. यासंदर्भात आतापर्यंत आलेले शासकीय आदेशाचे वाचन करण्यात आले. तहसीलदार दीपक गिरासे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लाभ देण्यात आलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी तसेच स्वयंसहायता गट यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात पोषण आहार प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते . तसेच पोषण गुढी उभारण्यात आली होती. आशाताईंनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSocialसामाजिक