शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

फकिरवाडी झोपडपट्टीत आगीचा भडका, सुदैवाने  मोठा अनर्थ टळला

By अझहर शेख | Updated: November 7, 2022 13:32 IST

अग्निशमन दल शिंगाडा तलाव येथील जवान घटनास्थळी वेळेत दाखल झाले. ता

नाशिक  : येथील अमरधाम रस्त्यालगत असलेल्या दरबार रोडवरील फकीरवाडी झोपडपट्टीमध्ये अचानकपणे सोमवारी (दि.७) एका घरात शॉर्ट सर्किट होऊन दुपारी बारा वाजता आगीचा भडका उडाला. सुदैवाने हे घर बंद होते. तसेच घरातील सिलिंडरने पेट घेतला नसल्याने मोठा अनर्थ टळला. 

अग्निशमन दल शिंगाडा तलाव येथील जवान घटनास्थळी वेळेत दाखल झाले. तातडीने आग विझविण्याची आपत्कालीन कार्य सुरू करण्यात आले, मात्र अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा हा परिसर असल्याने हा आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाचा बंब दरबार रोडने चढावरती नेऊन थांबविण्यात आला. तेथून घटनास्थळापर्यंत अग्निशमन दलाच्या लोकांनी पाईप लावून पाण्याचा मारा करत घराला लागलेली आग विझवली. 

यावेळी सर्व परिसर धुरामध्ये हरवलेला होता. घरातील फ्रिज, लाकडी कपाटसह संसारपयोगी अन्य वस्तूंची राख झाली. यामध्ये सलीम खान लतीफ खान आणि आतिक खान अशा तिघांच्या कुटुंबीयांचा संसार बेचिराख झाला हे कुटुंबीय आज सकाळीच साडेसहा वाजता घर कुलूप बंद करून लग्नासाठी पाचोराच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे आग लागली, तेव्हा घरात कोणीही नव्हते. कुटुंबीय पिंपळगाव बसवंतपर्यंत पोहोचलेले असताना त्यांना रहिवाशांनी घटनेची  माहिती कळविली असता त्यांनी पुढचा प्रवास थांबून पुन्हा घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. 

अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी आले. पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझविण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी दरबार रोड परिसराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता तसेच बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. यामुळे आपत्कालीन कार्य सुरळीतपणे पार पडले. अत्यंत लोकवस्तीचा हा परिसर असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र अग्निशमन दलाने वेळीच दाखल होऊन पुढचा धोका टाळला त्यामुळे नागरिकांनी व रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग