शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्‍लोक कोरलेला ताम्रपट अर्पण

By संजय पाठक | Updated: August 8, 2023 17:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात.

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज आणि साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकिर्दिवर शंभर श्‍लोक लिहिले आहेत. हे श्‍लोक ताम्रपटावर कोरून त्यांनी हा पवित्र ताम्रपट आज पंतप्रधान मोदींना अर्पण केला आहे. या ताम्रपटाला मोदी शतकम असे नाव देण्यात आले असून ताम्रपटावर कोरलेले श्‍लोक पाहुन मोदी भारावून गेले.

यावेळी महंतांच्या शिष्टमंडळाने मोदींकडे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशकात संस्कृत विश्वविद्यालय उभारावेत, काशी विश्वनाथच्या धरतीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा तसेच भारतातील सर्व मठ आणि आखाड्यांमध्ये महिलांसाठी साध्वी भवन उभारण्यात यावे आदि आग्रही मागण्या केल्या.

आज नाशिकचे खासदार हेमंत गेाडसे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे यतीशचंद्रमिश्रा,शैलेन्द्र उदावंत,पंकज मिश्रा आदि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्लीत जात पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी ताम्रपट मोदी यांना अर्पण केला. नाशिकमधील सुजित जोशी, दिपेश देशपांडे आणि मिलिंद फडके या कलाकारांनी दीड महिना अहोरात्र काम करून श्‍लोक ताम्रपटावर कोरण्याचे काम केले. श्‍लोक कोरलेला ताम्रपट तीन फुट बाय सव्वा दोन फुट इतक्या आकाराचा आहे.

टॅग्स :NashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदी