शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:53 IST

श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे.

नाशिक - जेलरोड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा मंगळवारी शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गंधर्व नगरीतील श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जेलरोड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिक्षण घेत होती. 

मंगळवारी सकाळी शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करतानाच तिला अचानक चक्कर आली आणि ती मैदानावर कोसळली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तिला त्वरित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे.

अलीकडेच पुण्यात एका २७ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सुभाष दाते हा तरुण जम्मू काश्मीर भारतीय सैन्य दलात कार्यरत होता.  गेले दोन वर्षापासून दाते जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.)ह्या पदावर कार्यरत होता. मात्र पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने सुभाष पाच दिवसांची रजा घेऊन गावी परतले होता. बुधवारी ३० तारखेला सुभाष हे झोपेतून उठले असता त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरू झाले. तात्काळ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे पाठवले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, राजस्थानच्या सीकरमध्ये काही दिवसांआधी अशीच घटना बघायला मिळाली. इथे एका ९ वर्षाच्या मुलीने हार्ट अ‍ॅटॅकमुळे जीव गमावला. ही घटना शाळेत लंच ब्रेकदरम्यान घडली होती. प्राची कुमावत लंच बॉक्स उघडताच अचानक बेशुदध पडली. शिक्षक तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. नंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पण तिथे पोहोचण्याआधीच तिचा जीव गेला होता.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका