शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू, पोलिसात नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 18:57 IST

त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला. 

वसंत तिवडे

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेच्या आश्रमशाळेतील पहिलीचा विद्यार्थी निवृत्ती बाळू चावरे (६, रा. कळमुस्ते (ह) ता. त्र्यंबकेश्वर) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी सदर मुलाचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचा दावा केला असला तरी या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत आश्रमशाळेतील अधीक्षक नंदू देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती चावरे याच्याबरोबरच त्याच्या समवेत त्याच्या तीन बहिणीही शिक्षण घेत आहेत. होळीच्या सणासाठी सोमवार, दि. ६ मार्च रोजी सर्व भावंडे आपल्या पालकांबरोबर गेले होते. पालक कळमुस्ते ह. येथील असले तरी ते पोटा पाण्यासाठी विंचूर, ता. निफाड येथे द्राक्ष मळ्यात कुटुंबीयांसमवेत राहतात. तेथे या मुलांना नेल्यानंतर सुट्यांच्या काळात त्यांनी द्राक्षांचे सेवन केले. द्राक्षांच्या अतिसेवनाने निवृत्ती यास खोकला, सर्दी झाली होती. नेहमीचा सर्दी-खोकला म्हणून पालकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. 

पालकांनी मुलांना दि. १३ मार्च रोजी आश्रमशाळेत आणून सोडले आणि ते परत विंचूरला निघून गेले. सर्व मुले व्यवस्थित होती. सायंकाळच्या भोजनास ही मुले गेली नाहीत. कारण त्यांनी घरूनच डबा आणला होता; पण सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास खांबाला धरून चकरा मारणारा निवृत्ती अचानक चक्कर आल्यामुळे खाली कोसळला. हातापायाची कापरे होऊ लागल्याने आश्रमशाळेतील देवरे व जाधव या शिक्षकांनी त्यास जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल येवले यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली तर पालकांनाही आणण्यात आले. शवविच्छेदनात मृत्यूचे निदान न्यूमोनिया असल्याचा रिपोर्ट डाॅक्टरांनी दिला असल्याचेही देवरे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन गवळी करत आहेत.

नियमित आरोग्य तपासणीची मागणीनाशिक जिल्ह्यातील सर्वच आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवृत्तीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम लचके, जिल्हा सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उपसचिव मुरलीधर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू