शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर-मधमेश्वरमधून हंगामी 98 हजार क्यूसेक पाणी मराठवाड्याल; जूनपासून पाणी सोडण्यास प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 14:15 IST

हंगामी एकूण विसर्ग

नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास 80 टक्के पेक्षा अधिक ठरला असून सातत्याने विसर्ग गोदावरी केला जात आहे धीरज जून महिन्यापासून अद्यापपर्यंत या बंधाऱ्यातून मराठवाड्याच्या दिशेने तब्बल 98 हजार 123 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक शहरात पावसाची मुसळधार अद्याप सुरू नसली तरी जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाने लावली आहे या हंगामात जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी 695 मिलिमीटर पर्यंत पोहोचले आहे. सध्या दारणा, भावली या धरणांमधून विसर्ग सुरू आहे तसेच पावसाचे पाणीही वरील तालुक्यांतून वाहून या बंधाऱ्यात येत आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर असून रविवारी 16 हजार क्यूसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला होता.

दारणा धरण 90 टक्के भरल्याने या धरणातून 12 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. 1जूनपासून अद्याप दारणामधून 43 हजार 276 क्यूसेक इतके पाणी पुढे नदीपात्रात वाहून गेले आहे.  एकूणच पावसाच्या हंगामाच्या या तीन महिन्यात मराठवाड्यात नाशिकच्या धरणांमधून मोठया प्रमाणात पाणी पोहचले आहे. यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ होण्यास नक्कीच मदत झाली आहे.

नाशिकमधील भावली 110 टक्के, दारणा 91 टक्के, गंगापूर 77 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 73 टक्के, वालदेवी 71 टक्के, कडवा 87 टक्के इतके भरले आहेत. उर्वरित धरनांचा जलसाठा 60 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. नाशिकमध्ये रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 24 तासांत सरासरी 23 मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. यामध्ये इगतपुरीत 81, सुरगाण्यात 70, पेठमध्ये 53, त्र्यंबकेश्वरला 51 मिमी इतका पाऊस मोजला गेला. गंगापूर धरण 90 टक्के भरल्यानंतर यामधूनसुद्धा विसर्ग केला जाण्याची श्यक्यता आहे. सध्या नाशिक शहरात पावसाचा जोर कमी असल्याने गोदावरीला अद्याप या हंगामात लहान पूरसुद्धा आलेला नाशिककरांनी बघितला नाही. मागीलवर्षी याच महिन्यात नाशिककरांनी महापूर अनुभवला होता.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकRainपाऊस