शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आठवडाभरातच ९६ जणांना डेंग्यूचा डंख

By suyog.joshi | Updated: July 9, 2024 10:55 IST

आदिवासी आयुक्तालय व महिला आयटीआयला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात शहरात ९६ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून ३०८ संशयितांची तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने डेंग्यूमुळे कोणाचा बळी गेला नसला तरी पावसाळ्याच्या प्रारंभीच परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. त्यांच्याकडून डेंग्यू उत्पत्तिस्थळांचा शोध घेतला जात असून, आदिवासी आयुक्तालय व महिला आयटीआयला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात यंदा डेंग्यू डासांचे प्रमाण वाढणार असून, रुग्णसंख्याही वाढेल असा धोक्याचा इशारा दिला. तो खरा ठरत असून, शहरात जुलैमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या हाताबाहेर गेली आहे. मागील जून महिन्यात १५५ डेंग्यू पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र, चालू जुलैच्या पहिल्या आठवड्यात ३०८ संशयितांपैकी पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा ९६ पर्यंत पोहोचला. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, शहरात सर्व विभागात भेटी देऊन डेंग्यू उत्पत्तिस्थळे शोधली जात आहेत. सर्वत्र धूर व औषध फवारणी सुरू आहे. मागील आठवड्यात केंद्राचे मलेरिया विभागाचे पथक शहरात येऊन गेले. त्यांनी डेंग्यूचे उत्पत्तिस्थळे तत्काळ नष्ट करा व उपाययोजना राबवा अशी तंबी दिली. त्यानंतर मनपा आरोग्य विभाग घरोघरी भेटी देत आहे. तसेच बांधकाम प्रकल्प, शासकीय कार्यालये व जे ठिकाण डेंग्यूचे हाॅटस्पाॅट ठरू शकतात त्यांना नोटिसा बजावत आहे. मागील सहा महिन्यांत डेंग्यू उत्पत्तिस्थळे आढळल्याप्रकरणी ५४ हजारांचा दंड आकारला आहे. विभागनिहाय रुग्ण आकडेवारीसातपूर - २सिडको - ३८नाशिक पूर्व - १५नाशिकरोड - २१नाशिक पश्चिम १०पंचवटी - १० शहरात महापालिकेच्या वतीने नियमित धूरफवारणी केली जात आहे. मागील आठवड्यात ९६ डेंग्यू पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. मलेरिया विभागाकडून धूर व औषध फवारणी, डेंग्यू उत्पत्तिस्थळे शोधणे व घरोघरी भेटी देणे सुरू असून, दंडात्मक कारवाई केली जात आहे. शासकीय कार्यालयांचीही तपासणी केली जात आहे.

-- डाॅ. नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ, मलेरिया विभाग मनपा

टॅग्स :Nashikनाशिक