शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कळवण तालुक्यात ९५ गावात ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:33 IST

कळवण  तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार ९५ गावात गुरुवारी श्री गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली . स्थापनेपूर्वी कळवण शहरात तसेच अभोणा ,कनाशी तसेच आदीवासी भागातील मंडळानी जोरदार मिरवणुका काढून गणरायाची विधीवत स्थापना केली. शहर व तालुक्यात बहुतांशी ठिकाणी घरोघरी गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली.

ढोल, ताशे अन् बाल गोपाळांच्या गुलालाची उधळण करीत गुरुवारी विघ्नहर्त्याचे जल्लोषात आगमन झाले. त्यासाठी कळवणची श्री विठ्ठल नगरी सज्ज झाली होती. शहरातील मेनरोड व बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पसरले होते. सकाळपासूनच गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच घरोघरी बाप्पांच्या स्वागताच्या जय्यत तयारीला सुरु वात झाली होती. आॅनलाईन पध्दतीने गणेश मंडळानी परवानगीसाठी फार्म भरले असून यंदा गणेशमंडळाची नाल बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.कळवण तालुक्यातील मार्कंडपिंप्री, मळगाव ,कातळगाव, मोहनदरी, धनेर, भैताने, आठंबे ,पाळे पिंप्री, निवाणे, चाचेर, बगडू, जिरवाडे, पाटविहीर, शिरसमनी, बगडू , निवाणे आदी तालुक्यातील ९५ गावामध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे . कळवण शहरात २५ तर ग्रामीण भागात १५ मोठ्या मंडळानी गणरायाची स्थापना केली आहे. शहरात २० तर ग्रामीण भागात १४ लहान मंडळानी स्थापना केली असून ३० गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना केली आहे. अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत ४५ मंडळ तर ६५ गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी उपद्रवी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करुन गोंधळ घालणाऱ्या उपद्रवींवर कडक कारवाई केली जाणार आहे.- सुधाकर मांडवकर , पोलिस स्टेशन, कळवणकळवण तालुक्यात गणेश उत्सव काळात भारनियमन होणार नसून गणेश मंडळांनी अधिकृतपणे वीज पुरवठा घेऊन वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. अनधिकृतपणे वीजेचा वापर आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.- ऋषीकेश खैरनारउपकार्यकारी अभियंता 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव