शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३६३ नागरिकांकडून ९२ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 00:54 IST

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढू लागल्यामुळे निर्बंधांची कठोरपणे अंमलजबावणी केली जात आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील ...

ठळक मुद्देविनामास्क वावर भोवला मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक कारवाई

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढू लागल्यामुळे निर्बंधांची कठोरपणे अंमलजबावणी केली जात आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. रविवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कारवाईमध्ये मास्कविना वावरणाऱ्या ३६३ बेफिकिरांवर दंडात्मक कारवाई केली. तब्बल ९१ हजार ९०० रुपयांचा दंड एका दिवसात पोलिसांनी वसूल केला.राज्य सरकारने सर्व अस्थापना मेडिकलचा अपवाद वगळता, सर्व शहरांमध्ये रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश रविवारी जारी केला आहे. त्याचप्रमाणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे, तरीही शहरात बहुतांश भागामध्ये निष्काळजीपणे मास्कविना वावरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे, निर्बंधांचा भंग करणाऱ्या अस्थापनांच्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. ग्राहकांची गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानांपुढे योग्य त्या अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी सांकेतिक खूण म्हणनू पांढऱ्या रंगाने वर्तुळ अथव चौकोने आखून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. n नागरिकांची गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखण्यास मदत होईल या हेतुने कारवाई केली जात आहे. मात्र, अद्यापही बहुतांश व्यावसायिकांनी या अंमलबजावणी करण्याबाबत उदासीनता दर्शविलेली दिसून येते. n ज्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करण्यास कचुराई केल्याचे दिसून आले अशा एकूण दहा अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अस्थापनाचालकांकडून एकूण ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. n सामाजिक अंतराचे उल्लंघन करणाऱ्या चार इसमांवर कारवाई करत, प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे चार हजारांचा दंड करण्यात आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या