शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सिन्नर तालुक्याचा ९०.५५ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:03 IST

सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश्वर महाविद्यालांनी शंभर टक्के निकालाने बाजी मारली आहे.

सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश्वर महाविद्यालांनी शंभर टक्के निकालाने बाजी मारली आहे. तर १९ उच्च माध्यमिक विद्यालयांनी निकालाची नव्वदी पार केली.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यात तालुक्यातील २८ कनिष्ठ महाविद्यालयांतील ४२१४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकुण निकाल ९०.५५ टक्के इतका लागला आहे.तालुक्यातील महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे. :- जीएमडी आर्टस्, बीडब्ल्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज सिन्नर - (९१.५९), ब. ना. सारडा उच्च माध्यमिक विद्यालय (९५.८३), महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय (७५.४४), न्यू इंग्लीश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, बारागाविपंप्री (९५.८०), श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लीश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, दोडी (९५.७७), पी. आर. भोर विद्यालय, ठाणगाव (९४.१६), न्यू इंग्लीश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वडांगळी (९०.९५), नूतन विद्यालय आणि अ‍ॅड रावसाहेब शिंदे ज्युनिअर कॉलेज, वावी (९२.०४), देवूपर हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (८८.५७), जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव (८९.९२), उच्च माध्यमिक विद्यामंदिर, दापूर (९७.६५), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दातली (९३.०४), जनता विद्यालय, पांढुर्ली (९०.६९), व्ही. पी. नाईक हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, नांदूरशिंगोटे (९७.२९), श्री भैरवनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, शहा (८५.४१), पाथरे ज्युनिअर कॉलेज (७१.४२), टी. एस. दिघोळे विद्यालय, नायगाव (९३.८२), एस. जी. पब्लीक स्कूल, कुंदेवाडी (९८.३३), उच्च माध्यमिक आश्रमशाळा, चापडगाव (७८.१२), जनता विद्यालय, डुबेरे (९०.००), आमदार माणिकराव कोकाटे ज्युनिअर कॉलेज, पंचाळे (९६.०३), श्री साईनारायण गुरुकुल ज्युनिअर कॉलेज, कोनांबे (८६.६६), श्री स्वामी समर्थ विद्यालय, आगासखिंड (१००), शताब्दी सायन्स कॉलेज, आगासखिंड (९०.९०), नवजीवन डे स्कूल, सिन्नर (९६.६२), एस. एस. के महाविद्यालय, वडझीरे (९७.१४), श्री सिद्ध कपालेश्वर ज्युनिअर कॉलेज, खंबाळे (१००), ज्युनिअर कॉलेज, पांगरी (८२.९७), एसबीएस गडाख उच्च माध्यमिक विद्यालय, पंचाळे (९८.१०) टक्के निकाल लागला. एमसीव्हीसी च्या ट्रेडसाठी जी. एम. डी. विद्यालय, सिन्नर (९१.५७), महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, सिन्नर (४५.३३) टक्के इतका निकाल लागला.मोबाईलद्वारे घरबसल्या निकालगुरुवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला मात्र प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि त्यावर इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी घरबसल्या निकाल मिळवले. परिणामी, शाळांकडे एकही विद्यार्थी फिरकतांना दिसला नाही. केवळ प्राचार्य व शिक्षक निकालाचे आॅनलाईन पत्रक काढून प्रथम, द्वितीय, तृत्तीय आलेल्या विद्यार्थ्यांची तुलनात्मक यादी काढतानाचे चित्र दिसत होते.

टॅग्स :Nashikनाशिक