शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:36 IST

राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे.

नाशिक : राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे.गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या पडताळणी कार्यक्रमाची मुदत सुरुवातीला २० डिसेंबर २०१९ पर्यंत होती. परंतु बीएलओंकडून अपेक्षित कामे होऊ न शकल्याने मतदार कर्मचाऱ्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत जिल्ह्णातील पंधरा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्यांकडून पडताळणी झालेल्या मतदारांची माहिती घेतली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार ९३ टक्के पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, शुक्रवारी जाहीर करण्यात येणाºया आकडेवारीनंतर यात आणखी एक ते दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्णातील १५ मतदारसंघांत ४५ लाख ६२ हजार ५७१ मतदारांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेने हातात घेतले आहे. पडताळणीची मुदत संपुष्टात येत असतानाही जिल्ह्णातील पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्याने या पाचही ठिकाणी शेवटच्या दिवशी अधिक प्रभावीपणे मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, एकदा या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. अंतिम दिवसाचा अहवाल हाती आल्यानंतर ज्या मतदारसंघातील पडताळणीचे काम कमी झालेले आहे अशा ठिकाणी काम करणाºया बीएलओंचे मूल्यमापन केले जाणार आहे.जे कर्मचारी मोहिमेत अपेक्षितप्रमाणे कामे करू शकली नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. रेडझोनमध्ये असलेल्या पाच मतदारसंघांतील पडताळणीची टक्केवारी पाहिली तर त्यामध्ये एखादा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांवर कारवाईची टांगती तलवार लटकणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान