शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचे ८७ कामगार अडकले गुजरात राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:03 IST

मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.गुगुळवाड येथील आदिवासी भील्ल समाजाचे ८७ ऊसतोडणी कामगार दरवर्षाप्रमाणे बारडोलीजवळील महू या साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेलेले होते. अचानक सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे ते सर्व कामगार एक महिन्यापासून अधिक काळ तेथेच अडकून पडलेले आहेत. त्यांच्यात लहान मुले तसेच एक गरोदर महिला असून, रावा सोनवणे या ऊसतोडणी कामगाराची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांच्या जवळ अन्नधान्य तसेच पैसे नसल्याने त्यांची तेथे प्रचंड हालअपेष्टा उपासमार होत आहे.  यासंदर्भात तहसीलदार चंद्रजितसिंह राजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, त्यांची यादी पाठवा आणि गुजरात सरकारला आम्ही त्यांची खाण्यापिण्याची व दवाखान्याची व्यवस्था करायला सांगतो, ८७ कामगारांची विहित नमुन्यातील यादी तहसीलदारांना दिलेली आहे; परंतु कामगार आता तेथे राहायला तयार नाहीत. गुजरात प्रशासन त्यांना नवापूरपर्यंत सोडायला तयार आहे, ते म्हणतात की नवापूरपासून आम्ही पायी यायला तयार आहोत; परंतु आठ महिन्यांची गरोदर महिला व एक गंभीर आजाराचे रुग्ण झाल्याने आम्ही त्यांना तूर्त येण्यास नकार दिलेला आहे, गुगुळवाडचे सरपंच लहू सोनवणे यांचा मुलगा देवा सोनवणे हा मुकादम असून, त्याने ते सर्व कामगार नेलेले आहेत, असे येथील सामाजिक कार्यकर्ते आर. डी. निकम यांनी सांगितले.----कोटाला शिकायला गेलेल्या सुखवस्तू व श्रीमंत घरातील मुलांसाठी १०० बसेस पाठवणार असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलेले आहे, आणि या गरीब मजुरांसाठी सरकार काहीच करू शकत नाही का?- आर.डी. निकम, सामाजिक कार्यकर्ते, गुगुळवाड

टॅग्स :Nashikनाशिक