शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

८४० लाभार्थ्यांना जानेवारीअखेर घरकुल

By admin | Updated: December 23, 2014 23:50 IST

झोपडपट्टीमुक्त शहर : ८६० लाभार्थ्यांना मिळाल्या घरकुलाच्या चाव्या; प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

नाशिक : शासनाच्या बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत शहरात महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या ८४० घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारी २०१५ अखेर लाभार्थ्यांच्या हाती घरकुलाची चावी पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने आतापर्यंत शहरातील विविध भागांतील ८६० घरकुलांचे यापूर्वीच लाभार्थ्यांकडे हस्तांतरण केले आहे.नाशिक शहरात शासकीय जागेवर ३३, महापालिकेच्या जागांवर १६, तर खासगी जागांवर ११९ झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. त्यातील शासकीय जागेतील १३, महापालिकेच्या जागेतील ११ आणि खासगी जागांवरील ३२ झोपडपट्ट्या स्लम म्हणून घोषित झालेल्या आहेत. सन २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण १६८ झोपडपट्ट्या आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी शासनाच्या बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत घरकुलांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत महापालिकेने ८६० घरकुलांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे, तर ८४० घरकुलांचे हस्तांतरण जानेवारी २०१५ अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यात प्रामुख्याने संजयनगर येथील ४०, एरंडवाडी येथील ४०, चुंचाळे येथील ४८०, हॉटेल साईपॅलेसमागील शहिद भगतसिंगनगर येथील १२० आणि चेहेडी-सामनगाव रोडवरील १६० घरकुलांचा समावेश आहे. या घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून, बांधकाम विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सदर घरकुलांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे झोपडपट्टी विभागाचे अधिकारी यशवंत ओगले यांनी सांगितले. सदर घरकुल योजना ही शासकीय व महापालिकेच्या जागांमध्ये असलेल्या झोपडपट्टी भागातच राबविली जात आहे. महापालिकेने २१२० घरकुलांची सोडत काढलेली आहे. जानेवारीअखेर ८४० लाभार्थ्यांना घरकुले हस्तांतरीत झाल्यानंतर एकूण १७०० घरकुलांचे वाटप करण्याचे काम पूर्ण होणार आहे. उर्वरित ४२० घरकुलांच्या वाटपाबाबतची कार्यवाही बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानंतरच राबविली जाणार आहे.