शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

By admin | Updated: October 28, 2016 23:38 IST

मनपाकडून नोटिसा : ७ नोव्हेंबरनंतर राबविणार मोहीम

नाशिक : न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहरातील ३१६ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर अडथळा ठरणारी ८४ धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने सदर कारवाईसाठी दि. ७ नोव्हेंबरपासून नियोजन केले आहे. महापालिकेने शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले असता सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. न्यायालयाने सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी राज्यातील सर्व महापालिकांना आदेशित केल्याने राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, सन २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबर २०१६ च्या आत हटवावी लागणार आहेत. महापालिकेने रस्त्यांवर अडथळे ठरणाऱ्या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली असून, त्यांना गेल्या आठ दिवसांपासून नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. दिवाळीनंतर दि. ७ नोव्हेंबरपासून सदर अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. सदर धार्मिक स्थळांची पोलीस ठाणे निहाय यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यात अंबड पोलीस ठाणे हद्दीतील ४, सातपूर व गंगापूर- १०, पंचवटी-१८, म्हसरुळ- ३, आडगाव- ४, नाशिकरोड-देवळाली- १९, मुंबईनाका-१२, उपनगर-७, भद्रकाली-३ आणि सरकारवाडा-५ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी महापालिकेकडून पुरोहितांची नियुक्ती केली जाणार आहे. अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुरोहितांमार्फत मूर्ती विधीवत बाजूला काढली जाऊन संबंधितांच्या ताब्यात दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)धर्मगुरूंची आयुक्तांशी चर्चामहापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने या कारवाईस धार्मिक संस्थांचे विश्वस्त व धर्मगुरुंनी आक्षेप घेतला आहे. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, महंत भक्तिचरणदास, सोमेश्वरानंद सरस्वती यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन सदर कारवाईबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत सर्व धर्मगुरुंना विश्वासात घेऊन योग्य तो बदल करण्याची सूचनाही या धर्मगुरू व विश्वस्तांनी आयुक्तांकडे केली आहे.