शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

८३ झाडांचे बुंधे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:16 IST

एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज्ञात इसमांनी जाळल्याचे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आले

नाशिक : एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज्ञात इसमांनी जाळल्याचे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आले, हे दुर्दैवच. मात्र याकडे मनपा उद्यान विभागाने कानाडोळा करणे पसंत केल्याने संताप व्यक्त होत आहे.  शहरामधील वृक्षसंपदा जतन करणे व ती वाढविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून, शहराबाहेरील वृक्षसंपदेच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वनविभागाची आहे. सध्या शहरातील वृक्षराजीला कोणी वालीच राहिले नसल्याचे चित्र दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा नसला तरी सर्रासपणे तो वृक्ष तोडला जातो, तर दुसरीकडे छाटणीच्या नावाखाली वृक्षांचा केवळ बुंधा ठेवला जातो. तसेच महापालिकेचे कर्मचारी सांगून वृक्ष तोडण्याचा सपाटाही शहरातील विविध भागांमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईदगाह मैदानावरील शेकडो वर्षे जुने वटवृक्ष अज्ञात इसमांनी कापून लंपास केले; मात्र त्याची कुठलीही दखल महापालिकेच्या संबंधित विभागाने घेतली नाही. वृक्ष संरक्षण अधिनियमानुसार विनापरवानगी वृक्षतोड करणे गुन्हा ठरतो. मात्र या कायद्याची अंमलबजावणीबाबत संबंधित शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गोदापार्क परिसरात बांबू, निलगिरी, अशोक, कडूनिंब, कदंब अशा विविध प्रजातीचे डौलदार वृक्ष आहे.वटवाघळांचा अधिवास धोक्यातनिलगिरी वृक्षांवर शेकडोंच्या संख्येने वास्तव्यास असलेल्या वटवाघळांचा अधिवास झाडांच्या बुंध्यांना लावलेल्या आगीमुळे असुरक्षित बनला. आगीमुळे येथील वटवाघळे सैरभैर होऊन शासकीय रोपवाटिकेमधील झाडांवर स्थलांतरित झाले. येथील वृक्षसंपदेवर वटवाघळांची वसाहत आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाऐवजी वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा प्रताप होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा या विकृ त प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.झाडांना कमकुवत करण्याचा प्रयत्ननिलगिरी वृक्षाला औषधी महत्त्व असून, येथील उंच हिरव्यागार वृक्षांची कत्तल करणे अवघड असल्यामुळे झाडांना कमकुवत करण्यासाठी तस्करांनी बुंधे पेटविल्याची चर्चा आहे. बुंधे पेटविल्यामुळे झाडे आपोआप कोसळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यानंतर या झाडांची विल्हेवाट लावणे सोपे होईल, हा यामागील उद्देश असल्याचाही संशय घेतला जात आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Fairजत्रा