शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
2
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
3
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
4
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
5
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
6
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
7
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
8
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
9
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
10
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
11
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
12
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
13
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
14
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
15
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
16
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
17
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
18
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
19
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
20
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!

८० टक्के युवकांनी घरकामात केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:58 IST

नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.

ठळक मुद्देसर्वेक्षण : नवीन कौशल्य शिकले, आरोग्याबाबतही वाढली सजगता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सर्वांनाच घरी बसावे लागत आहे. यासंदर्भात नाशिकमधील युवकांना काय वाटते, त्यांचा वेळ कसा गेला, त्यांनी या कालावधीकडे कसे बघितले याविषयी एचपीटी महाविद्यालयातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी प्राजक्ता नागपुरे हिच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण करून लॉकडाउनविषयी युवकांची मते जाणून घेतली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे व प्रा. रमेश शेजवळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. लॉकडाउन करण्याची गरज होती किंवा नाही याबाबत सध्या राजकीय आरोप सुरू झाले असले तरी ९५ टक्के युवकांनी त्याचे समर्थन केले. मात्र आता लॉकडाउन संपवावाच असे मत ७५ टक्के जणांचे मत आहे. लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढले असे ७४ टक्के जण सहमत आहे. मात्र, त्यातून भारत सावरेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ५२ टक्के युवकांनी या कालावधीत विविध कौशल्ये आत्मसात केली आहेत. खासगी आयुष्य जपता येत नाहीघरातच कुटुंबासमवेत असल्याने खासगी आयुष्य जपता येत नाही असे १८ टक्के युवकांचे मत असल्याचे सर्वेक्षणात आढळले, तर २९ टक्के युवकांना काही प्रमाणात खासगीपण जपता येत नाही असे वाटते.जीवनाचा खरा अर्थ कळालालॉकडाऊनच्या काळात जीवनाचा खरा अर्थ कळाला असे मत ७३ टक्के जणांनी व्यक्त केले आहे. ९७ टक्के युवकांनी आरोग्य सजग होताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनामुळे आता काही खरं नाही अशी भीती २५ टक्के युवक-युवतींनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर