शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

म्युकरमायकोसिसचे  जिल्ह्यात आतापर्यंत ८ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:42 IST

कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून, ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. 

नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून, ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईड आणि तत्सम इंजेक्शनच्या अधिक वापरामुळे शहरात आतापर्यंत १२७ तर जिल्ह्यात एकूण १८९ रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव आणि नाशिक शहरातच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण असण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक, कान, घसा तज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांचाच भरणा अधिक आहे. रेमडेसिविरप्रमाणे रुग्णालयांनाच ॲम्फोटेरेसिनचे वाटप म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी वापरले जाणारे ॲम्फोटेरेसिन ही इंजेक्शन आतापर्यंत २०० प्राप्त झाली होती. मात्र, त्यांच्या वाटपात आधी एक नियोजन, नंतर त्यात बदल, पुन्हा अचानक रांगा लावण्यास सांगून उपस्थित असतील त्यांना वाटप असे फेरबदल करण्यात आल्याने नागरिकांना तासन् तास तिष्ठत राहावे लागले होते. तसेच आठ-दहा तास थांबूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिकांच्या संतापाचा सामना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागला. त्यामुळे आता सर्व इंजेक्शन्सचे वाटप हे रेमडेसिविरप्रमाणे हॉस्पिटल्सच्या मागणीनुसार प्रथम मेल करणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर आणि उपलब्ध संख्येनिहाय देण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना प्रत्येक इंजेक्शनची रक्कम आधी हॉस्पिटलला भरून मग त्या हॉस्पिटलने जिल्हा प्रशासनाकडे मेल पाठवल्यावरच ॲम्फोटेरेसिनची इंजेक्शन्स उपलब्ध होऊ शकणार आहेत.स्टेरॉईड दिलेल्या मधुमेहींनाच अधिक धोकामे महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाच्या उपचारादरम्यान ज्या रुग्णांना रेमडेसिविर, टोसिलेझुमॅब यासह काही अन्य स्टेरॉईडचा उपयोग करावा लागला होता, त्यातील काही मधुमेही रुग्णांनाच किंवा ज्यांची शुगर या स्टेरॉईड्समुळे प्रचंड प्रमाणात वाढली, त्या रुग्णांना काही दिवसांनी नाकात, कानात किंवा डोळ्यांना त्रास होऊ लागल्याचे लक्षात आले. अशा रुग्णांनाच म्युकरमायकोसिस झाल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना स्टेरॉईड देताना त्यांची शुगर वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिले आहेत.

३४ रुग्ण बरे नाशिक शहरात १२७ तर जिल्ह्यात १८९ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. १२९ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, २४ रुग्ण अधिग्रहीत कोविड सेंटरमध्ये तर २ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अधिकृत नोंदीपेक्षाही ज्यांना या आजाराचा त्रास होऊनही माहितीच नाही किंवा कोरोनाच्या दुष्परिणामामुळे असा त्रास होत असेल, असाच ज्यांनी समज करून घेतला अशा रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMucormycosisम्युकोरमायकोसिस