शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून ८ लाखांची चोरी ; मुद्देमालासह संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 01:18 IST

धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास सीसीटीव्हीच्या आधारे मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार दिवसात अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देमनमाड : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
मनमाड : धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास सीसीटीव्हीच्या आधारे मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार दिवसात अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दौंड - मनमाड लोहमार्ग वरून बेंगलोर ते नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस बोगी क्रमांक एस-१२ मधून प्रवास करीत असताना सीटवर ठेवलेले कॅमेरा, लेन्स तसेच कागदपत्रे व रोख रक्कम असलेली शॉर्ट बॅग अज्ञात चोरट्याने कोपरगाव ते मनमाड रेल्वे स्थानक दरम्यान चोरून नेल्याची फिर्याद कलाधरण कलाकुमार पद्मकुमार(२४, रा. केरळ) यांनी दिली होती. या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे तपासादरम्यान रेल्वे स्थानकात संशयस्पद फिरणाऱ्या नितीन विश्वनाथ आहिरे ( वय ३०, रा. पानेवाडी) या इसमास ताब्यात घेतले. तपासादरम्यान नितीन आहिरे याच्याकडे शॉर्टबॅग, कॅनॉन कंपनीचा ६ लाख रुपये किमतीचा कॅमेरा, निकॉन कंपनीचा कॅमेरा तसेच निकॉर कंपनीची लेन्स आणि १७०० रुपये रोख असे एकूण ८,२४,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयात त्यास हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. लोहमार्ग पोलीस अधीक्षक औरंगाबाद मोक्षदा पाटील,उपविभागीय लोहमार्ग पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,उपनिरीक्षक राजेंद्र यलगुलवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी संतोष भालेराव,महेंद्रसिंग पाटील रेल्वे सुरक्षा दलाचे मनिष कुमार यांनी ही कामगिरी केली.
टॅग्स :NashikनाशिकDacoityदरोडा