शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

७९ कर्मचाऱ्यांना सहायक  लिपिकाची पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:34 IST

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांना परिचर (गट ड) संवर्गातून कनिष्ठ सहायक लिपिक (गट क) संवर्गात पदोन्नती देण्यात येते. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील पत्रानुसार सदरची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासन विभागाने १६२ पात्र कर्मचाºयांची यादी तयार केली होती. या कर्मचाºयांना समुपदेशानासाठी बोलावण्यात आले होते. यातील ११ कर्मचारी अपात्र तर ७२ कर्मचाºयांनी पदोन्नतीस नकार दिल्याने उर्वरित ७९ जणांना पदोन्नती देण्यात आली. यावेळी उमेदवारांना उपलब्ध जागांची माहिती देण्यात येऊन त्यातील तीन जागांचा प्राधान्यक्रम देण्यातआला. तीन पर्यायांप्रमाणे उपलब्ध पर्यायातून कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात आली. त्याचप्रमाणे समुपदेशन झाल्यावर तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकिरण सोनकांबळे तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी