नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी ७७ मतदान केंद्रे क्रिटिकल घोषित करण्यात आली असून, २७९ संवेदनशील व ८६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांकडे मतदानाच्या दिवशी विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये सर्वाधिक २० मतदान केंद्रे क्रिटिकल घोषित करण्यात आली आहेत. महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार आहे. शहरातील एकूण ३१ प्रभाग मिळून १४३३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यातील १२४ मतदान केंद्रांच्या इमारतीतील ७७ केंद्रे क्रिटिकल घोषित करण्यात आली आहे. त्यात सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये १४, प्रभाग २५ मध्ये १९, प्रभाग २७ मध्ये ९, प्रभाग २८ मध्ये १५, प्रभाग २९ मध्ये २० मतदान केंद्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सारी क्रिटिकल मतदान केंद्रे सिडको विभागातीलच आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये प्रभाग १ मधील ८, प्रभाग ५ मधील १२, प्रभाग ६ मधील २८, प्रभाग ७ मधील १३, प्रभाग ९ मधील ९, प्रभाग १२ मधील ७, प्रभाग १३ मधील १६, प्रभाग १४ मधील ३, प्रभाग १५ मधील १, प्रभाग १६ मधील २४, प्रभाग १७ मधील २२, प्रभाग १८ मधील ३३, प्रभाग १९ मधील ८, प्रभाग २० मधील २२, प्रभाग २१ मधील १२, प्रभाग २२ मधील २२, प्रभाग २३ मधील १३, प्रभाग २६ मधील ६ याप्रमाणे केंद्रांचा समावेश आहे. अतिसंवेदनशील केंद्रांमध्ये प्रभाग ९ मधील ४, प्रभाग ११ मधील १०, प्रभाग १३ मधील ९, प्रभाग १४ मधील १५, प्रभाग १५ मधील २, प्रभाग १६ मधील ६, प्रभाग १७ मधील ९, प्रभाग २१ मधील २०, प्रभाग २२ मधील १० याप्रमाणे केंद्रांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
७७ मतदान केंद्रे क्रिटिकल घोषित
By admin | Updated: February 15, 2017 00:46 IST