शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

७६ गुन्हेगार सोमवारी दुपारपर्यंत राहणार शहराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:39 IST

: शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक : शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ७६ संशयितांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोमवारी (दि.२९) दुपारी २ वाजेनंतर हे संशयित शहरात परत येऊ शकतात, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मतदानप्रक्रियेच्या तोंडावर शहरात कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी नांगरे-पाटील यांनी विशेष खबरदारी घेत सूक्ष्मपणे कडेकोट बंदोबस्ताची आखणी के ली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी संशयित गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी कडक कारवाई केली असून, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारूविक्री व कुठल्याहीप्रकारे शांतता भंग करू पाहणाऱ्यांना येत्या सोमवारी दुपारपर्यंत शहरात राहता येणार नाही. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा लोकांचा शोध घेऊन सुमारे ७६ संशयितांना शहरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांत प्रथमच अशाप्रकारे संशयित गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, त्यांचा मतदानाचा हक्कदेखील सुरक्षित ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारपर्यंत हे ७६ संशयित शहरात येऊ शकतात व मतदानाचा हक्क बजावू शकतात, असे नांगरे-पाटील म्हणाले.रात्री १० वाजता रेस्टॉरंट, बार होणार बंदनिवडणूक निरीक्षकांनी मागील दोन दिवसांत देशी मद्याची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १३० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे शहरातील कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून खबरदारी घेत पोलीस आयुक्तांनी रात्री १० वाजता शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिटरूम, बार, देशी-विदेशी दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. हा आदेश येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी