शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आयटीआयमध्ये दुसऱ्या  फेरीअखेर ७४६ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:02 IST

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.

सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गेल्या पाच वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली. प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर ३३९९ प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. ११ ते दि. १५ दरम्यान प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली होती. त्यात ५४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. प्रवेशास अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे पाहून त्यावेळी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आली होती. प्रवेशाची दुसºया फेरीसाठी दि. २० ते दि. २५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. दि. २५ जुलै अखेर ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच दुसºया फेरीत अवघ्या २३१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. गुरुवारी एक दिवस प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्रम आणि ६२ तुकड्या असून, एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.बंदमुळे मुदतवाढमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येता आले नाही. याबाबत काही विद्यार्थ्यांनी संस्थेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तरी गुरु वारी उर्र्विरत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुभाष कदम यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी