निफाड : तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले तालुक्यात ७०.२७ टक्के मतदान झाले एकूण ३,२८,५६२ मतदारांपैकी २,३०,८७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी १, २५ १८६ पुरु ष तर १०५६८४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाशिक जिल्यातील जिल्हा परिषदेचे सर्वात जास्त दहा गट व वीस गण निफाड तालुक्यात असल्याने जिल्हापरिषदेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तालुक्यात मतदान सकाळी साडे सात ते साडे नऊ या दरम्यान २५३८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर साडेनउ नंतर घरातील कामे आटोपून महिला व पुरु षांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती साडे अकरा पर्यंत ५५९८० मतदारांनि केले. साडे अकरानंतरही मतदारांनी उन्हाची तमा न बाळगता मतदानात सहभाग घेतला दुपारी अडीच वाजेपर्यंत १०५०८२ मतदारांनी मतदान केले .याच दरम्यान ओझर येथील मतदान केंद्र क्र मांक २७ मधील मतदान यंत्रात दुपारी दीड वाजता अचानक बिघाड झाल्याने येथे तातडीने दुसरे मतदान यंत्र लावण्यात येऊन मतदान प्रक्रि या पूर्ववत करण्यात आली. दुपारी दीड वाजता उन्हाची तीव्रता अधिक असल्यान मतदान केंद्रावर मतदारांची संख्या अनेक ठिकाणी रोडावली होती . ओझर येथे सायंकाळी मतदारांची संख्या वाढल्याने नवीन इंग्रजी शाळा आणि माधवराव बोरस्ते विद्यालय येथील मतदान केंद्रावर सायंकाळी पावणे सात पर्यंत मतदान चालू होते.निफाड तालुक्यातील सर्व १० गटात प्रचंड चुरस दिसून आली. (वार्ताहर)
निफाड तालुक्यात ७०.२७ टक्के मतदान
By admin | Updated: February 22, 2017 01:54 IST