शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

मनपा हद्दीत दररोज ७०० कोरोना चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:46 PM

कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करून कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढविली आहे. त्यात कोविड-१९च्या नियमित ५०० चाचण्या आणि अ‍ॅँटिजेन किटच्या २०० चाचण्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसंसर्गाला आळा : नियमित ५०० आणि अ‍ॅँटिजेन किटद्वारे २०० चाचण्यांचे नियोजन

नाशिक : कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करून कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढविली आहे. त्यात कोविड-१९च्या नियमित ५०० चाचण्या आणि अ‍ॅँटिजेन किटच्या २०० चाचण्यांचा समावेश आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाशिक महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, दररोज बाधितांचा आकडा दोनशेहून अधिकच्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर वृद्धांबरोबर मध्यमवयीन व्यक्तींचा मृत्यू होऊ लागला आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर कोरोना चाचण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयास केले जात असून, आरोग्य प्रशासनाकडून अहवालांची संख्या तातडीने वाढवण्याचे निर्देश दिले होते. माजी मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनीदेखील चाचण्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांनीदेखील या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले होते.तसेच बाधित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती व संशयित वृद्ध रु ग्णांच्या चाचण्या प्रलंबित राहत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच आता नाशिक महापालिका प्रशासनाकडून दररोज कोविडच्या ५०० नियमित चाचण्या आणि २०० अ‍ॅँटिजेन याप्रमाणे ७०० चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.जुलै महिन्यातील दहा दिवसांचा रुग्णांचा व मृत्यूचा वाढता आकडा नाशिककरांसह मनपा प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. शहरात गत दहा दिवसांत दीड हजारांहून अधिक रु ग्ण वाढले असून, पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने तयार केलेले क्वारंटाइन कक्ष, कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालय यातील खाटा भरत चालल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य