नाशिक : प्रथम शाही पर्वणीतील बंदोबस्तामुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या पोलीस प्रशासनाने दुसऱ्या पर्वणीसाठी केलेल्या फेरनियोजनामुळे भाविकांसह शहरातील नागरिकांना सुलभपणे स्नान करता आले़ तसेच पर्वणी किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडल्याने जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे़ दरम्यान, रविवारी (दि़१३) सुमारे सत्तर लाख भाविकांनी गोदावरीत स्नान केल्याचा अंदाज पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़
७० लाख भाविकांचे गोदावरीत स्नान
By admin | Updated: September 13, 2015 22:57 IST