शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ७० रुग्णालयांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 15:32 IST

नियमांची अपूर्तता : ३१९ रुग्णालये ठरली अनधिकृत

ठळक मुद्दे महापालिका क्षेत्रातील रु ग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसुतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधीत परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रु ग्णालयांनीच परवाना नुतनीकरण केले

नाशिक - महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या असून रुग्णांना दाखल करुन घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालय चालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.मुंबई सुश्रृषागृह अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रातील रु ग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसुतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधीत परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना नुतनीकरणासाठी नगररचना व अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला देखील असणे आवश्यक आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील अनेक जुनी रु ग्णालये, प्रसुतिगृह निवासी क्षेत्रात असल्यामुळे तसेच इमारतीच्या वापरात बदलाबाबत संबंधितांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नुतनीकरण सक्तीचे केले होते. मात्र, या कालावधीत मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रु ग्णालयांनीच परवाना नुतनीकरण केले. सुमारे ३१९ रु ग्णालयांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना अनिधकृत ठरविण्यात आले. त्यानुसार, संबंधितांना रु ग्णालय बंद करण्याच्या नोटीसाही काढल्या आहेत. या रु ग्णालयात रुग्णांना दाखल करून घेऊ नये अशा नोटीसा रु ग्णालयांबाहेर लावल्या जात आहेत.संशयास्पद केंद्रांना नोटीसागर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार, शहरातील सोनोग्राफी तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६८ पैकी १४२ सोनोग्राफी केंद्रांची तर १२३ पैकी ४८ गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असून संशयास्पद आढळलेल्या दोन सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल