शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज ७ रुग्ण : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा ९३६वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 22:29 IST

शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला.

ठळक मुद्देजुन्या नाशकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७ वरवडाळागावातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा ४ वर कायम शिवाजीवाडी झोपडपट्टीमध्ये आता २ कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही आता कोरोनाचा फास अधिक भक्कम होत चालला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून गावठाण व झोपडपट्टी भागांत कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा ७६ इतका झाला. तसेच जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या ९३६वर पोहचली. नाशिक ग्रामीण भागाचा आकडा १२५वर पोहचला आणि मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६९६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४७ कोरोनाग्रस्त रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरात ३ तर मालेगावात ४४ कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावले आहेत. आतापर्यंत ६७३ कोरोनाबाधित रूग्ण पुर्णपणे ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला. टाकळी समतानगर येथील एका वृध्द कोरोनाग्रस्त रुग्णाचा नमुना चाचणी अहवाल त्याच्या मृत्यूनंतर शनिवारी पॉझिटिव्ह आला. तसेच आज दुपारी प्राप्त अहवालानुसार शहरातील कॉलेजरोड भागात एक तर सिडकोच्या राणाप्रताप चौकात एक कोरोनाबाधित रुग्ण मिळून आला.शिवाजीवाडी या नासर्डीनदीच्या काठालगत असलेल्या झोपडपट्टीमध्येही कोरोनाबाधितांची संख्य आता २ झाली. वडाळागावातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा शुक्रवारी ४ वर कायम आहे. तसेच जुन्या नाशकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७ वर पोहचला आहे.शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिकांचे जत्थे शहरात पहावयास मिळत आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान शहरातील बाजारपेठांचा परिसर गजबजून जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMalegaonमालेगांव