दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच असून शुक्र वारी ७ बाधितांची वाढ झाल्याने रु ग्णसंख्या १२३ वर पोहचली आहे.दरम्यान उमराळे बु. येथील एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने बळींची संख्या चार वर गेली आहे. आतापर्यंत ८१ रु ग्णांनी कोरोनावर मात केली असून ३८ जणांवर उपचार सुरू आहेत.शुक्रवारी सकाळी लखमापूर येथील रु ग्णाच्या संपर्कातील ४, २४, २८ वर्षाचे तीन, ओझरखेड येथील २३ वर्षीय एक, मडकीजांब येथील ३५ वर्षीय महिला, चिंचखेड येथील २९ वर्षीय महिला,आंबे दिंडोरी येथील ३१ वर्षीय महिला असे ७ रु ग्ण आढळले आहेत .उमराळे येथे ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मोहाडीतील सर्व रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नागरिकांना काळजी घेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिंडोरी तालुक्यात ७ बाधित; रुग्णसंख्या १२३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:43 IST