शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

६३ शाळांचा गणवेशाविना स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:47 IST

राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले. परंतु नाशिक महापालिकेत ठेकेदारांसाठी टक्केवारीच्या सुरू झालेल्या स्पर्धेमुळे अडचण निर्माण झाली

नाशिक : राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले. परंतु नाशिक महापालिकेत ठेकेदारांसाठी टक्केवारीच्या सुरू झालेल्या स्पर्धेमुळे अडचण निर्माण झाली आणि प्रत्येक व्यावसायिकाने आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याने गणवेशाचा रंग आणि पुरवठादार यातून गोंधळ निर्माण झाला. यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी रंगनिश्चिती करून दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यास विलंब झाला आणि ९० पैकी ६३ शाळांपर्यंत गणवेश न पोहोचल्याने गणवेशाविनाच स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला आहे.  महापालिका शिक्षण मंडळाच्या ९० शाळा असून त्यात सुमारे २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्यावर्षी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये थेट अनुदान योजनेअंतर्गत गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी एक गणवेश या हिशेबाने दोनशे रुपये मंजूर केले. परंतु बहुतांशी पालकांनी गणवेश घेतले नसल्याने विद्यार्थ्यांना ते मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा शालेय व्यवस्थापन समित्यांवर जबाबदारी सोपवून त्यांना गणवेश खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला.केवळ शंभर रुपये वाढले म्हणून...गेल्यावर्षी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे रुपये प्रतिविद्यार्थी या हिशेबाने निधी मिळाला होता. यंदा मात्र तीनशे रुपये प्रतिगणवेश त्यातच एका विद्यार्थ्याला दोन गणवेश याप्रमाणे सहाशे रुपये मिळणार असल्याने स्पर्धा अधिक होती. अनेकांनी कट प्रॅक्टीसमध्ये दीडशे रुपये देण्याची तयारी संबंधित घटकांना केली असल्याने गणवेश पुरवठ्यात किती नफाखोरी होते, असे दिसते. शालेय व्यवस्थापन समितीला वाटेल तो रंग आणि पुरवठादार निश्चित करावा, असे निर्देश देतानाच शासनाने यात केंद्र किंवा तालुकास्तरावरून कोणीही हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट निर्देश असतानादेखील काही नगरसेवक व राजकीय नेत्यांनी पुरवठादार पकडून आणले आणि त्यांच्याकडूनच गणवेश खरेदी करावा, असा दबाव शालेय व्यवस्थापन समिती, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांवर आणला जाऊ लागला. त्यामागील टक्केवारीचे गणित मांडण्यात येऊ लागल्याने समित्या गोंधळात पडल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाmunicipal schoolमहापालिका शाळा