शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

महापालिकेच्या खजिन्यात ६१ कोटी रुपये अनुदान जमा

By admin | Updated: November 11, 2015 23:27 IST

पालिकेची दिवाळी : एलबीटीपोटी रक्कम

नाशिक : एलबीटी रद्द झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक महापालिकेला नोव्हेंबर महिन्याचे ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे शासन अनुदान प्राप्त झाले असून, मुद्रांक शुल्काच्या एक टक्का अधिभाराच्या माध्यमातूनही १५ कोटी रुपये मिळाल्याने पालिकेच्या खजिन्यात ६१ कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन अनुदानात कपात होण्याची भीती व्यक्त होत असतानाच शासनाने दिवाळीत भरघोस दान टाकल्याने पालिका प्रशासनाला मोठा दिलासा लाभला आहे. महाराष्ट्र शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेला दरमहा ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शासनाने आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांचे अनुदान ३७ दिवसांतच देण्याची तत्परता दाखविली होती. त्यातून महापालिकेला १३७ कोटी रुपये प्राप्त झाले होते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचे अनुदान रखडले होते. गेल्या सव्वा महिन्यापासून या अनुदानाची प्रतीक्षा होती. त्यातच, महापालिकेने ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर सुमारे ३४ कोटी रुपयांचे उत्पन्न वसूल केल्याने शासनाकडून अनुदानात कपात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शासनाने महापालिकेकडे त्यासंबंधी एकूण उत्पन्नाची आकडेवारीही मागितल्याने कपातीची शक्यता वाढली होती. शासनाकडून सुमारे १८ ते २० कोटी रुपयेच अनुदान मिळण्याची चर्चा होत असतानाच शासनाने मागील तारीख टाकत १४ आॅक्टोबरच्या निर्णयान्वये ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान महापालिकेला वितरित केले आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वीच शासनाने मुद्रांक शुल्काच्या एक टक्का अधिभारापोटी महापालिकेला १५ कोटी २३ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे महापालिकेला नोव्हेंबर महिन्यात ६१ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. (प्रतिनिधी)