शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

६६ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ६०१ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:17 IST

नाशिक : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून ६६ अंगणवाड्यांचे काम केले जाणार असले तरी, प्रत्यक्षात मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटात चार ते सहा अंगणवाड्यांची मागणी नोंदविल्याने सुमारे ६०१ प्रस्ताव दाखल झाले असून, या अंगणवाडी बांधकामाचे नियोजन करताना सभापतींची दमछाक होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमहिला बाल कल्याण : नियोजन करताना सभापतींची कसरत

नाशिक : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून ६६ अंगणवाड्यांचे काम केले जाणार असले तरी, प्रत्यक्षात मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटात चार ते सहा अंगणवाड्यांची मागणी नोंदविल्याने सुमारे ६०१ प्रस्ताव दाखल झाले असून, या अंगणवाडी बांधकामाचे नियोजन करताना सभापतींची दमछाक होऊ लागली आहे.नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेचार हजारांहून अधिक अंगणवाड्या कार्यरत असून, त्यातील बहुतांशी अंगणवाड्यांना स्वत:ची पक्की इमारत नाही. त्यामुळे समाज मंदिर, पारावर, मोकळ्या जागेवर अंगणवाडी भरते. अशा अंगणवाड्यांना कायमस्वरूपी स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी शासनाच्या जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो.

चालू सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी दायित्व वगळता अवघे तीन कोटी रुपये हाती पडले आहेत. एका अंगणवाडीच्या बांधकामासाठी साडेआठ हजार रुपये खर्च असल्यामुळे तीन कोटी रुपयांतून जेमतेम ६६ अंगणवाड्यांचे बांधकाम होवू शकते. त्यामुळे सभापती अश्वीनी आहेर यांनी बिगर आदिवासी तालुक्यातील सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या गटातील अंगणवाडी निकडीचे प्रस्ताव मागविले होते.

या प्रस्तावाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या ६६ अंगणवाड्यांसाठी ६०१ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यात महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या गटात चार ते पाच अंगणवाड्यांची मागणी नोंदविली तर अन्य सदस्य देखील दोन, चार अंगणवाड्या मिळाव्यात म्हणून अडून बसले आहेत. त्यामुळे ६०१ मधून ६६ अंगणवाड्यांची निवड कशी करावी असा प्रश्न सभापती आहेर यांना पडला आहे. सदस्य व पदाधिकाऱ्यांची समजूत काढतांना महिला व बाल कल्याण विभागाच्या नाकी नऊ आले असून, त्यामुळे अजुनही अंगणवाडी बांधकामाचे नियोजन होऊ शकलेले नाही.

उलट आदिवासी तालुक्यासाठी दहा कोटीचा निधी मंजुर असल्याने त्यातून १५९ अंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी २०० प्रस्ताव सादर झाले, प्रत्येक सदस्याच्या गटात बांधकाम होणार असल्याने आदिवासी सदस्यांची ओरड झाली नाही.

दरम्यान, आगामी आर्थिक वर्षात बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटींची तरतूद धरण्यात आल्याने बऱ्याचशा अंगणवाड्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंगणवाडी बांधकामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने ११२५ अंगणवाड्यांचे विक्रमी बांधकाम होऊ शकले होते.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका