शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

स्वच्छतेसाठी झटले ६०० कामगार

By admin | Updated: September 26, 2015 23:10 IST

क्लीन त्र्यंबक : वेतन अदा करण्यात मात्र अडथळे

नाशिक : कुठे कागदाचा कपटा पडला, प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसल्या अथवा कुठे अन्नछत्रातून उष्टेखरकटे बाहेर उघड्यावर टाकून दिले तर लगेच परिसर स्वच्छतेसाठी पुढे येणारे कामगार, असे सुखावणारे चित्र त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत भाविकांना पाहायला मिळाले. ‘क्लीन त्र्यंबक’ या संकल्पनेला हातभार लावणाऱ्या या कामगारांमधील अनेकांना मात्र गेल्या तांत्रिक मुद्यांमुळे वंचित राहावे लागले आहे. नाशिक महापालिकेप्रमाणेच त्र्यंबक नगरपालिकेनेही तीनही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेचे कंत्राट दिले होते. नांदेडच्या ठेकेदाराने सदर ठेका घेतला आणि ८०० कामगारांपैकी सुमारे ३५० कामगार हिंगोली, परभणी या भागातून आणले. उर्वरित कामगार हे त्र्यंबकेश्वर परिसरातील आसपासच्या खेड्यापाड्यांतील मोलमजुरी करणारे ग्रामस्थ होते. त्यामुळे निम्म्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. नाशिक महापालिकेच्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर याठिकाणीही कठोर नियमावली अंमलात आणण्यात आली. ठेकेदाराकडून रोज प्रत्येक सत्रातील कामगारांच्या हजेरीचा लेखाजोखा अ‍ॅपमार्फत घेण्यात येत होता. याशिवाय कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अ‍ॅपमार्फतच घेतली जात होती. सदर कामगारांना ३०० रुपये प्रति दिन रोज निश्चित करण्यात आला होता, असे कामगारांकडूनच सांगण्यात आले. १३ जुलै ते २६ सप्टेंबरपर्यंत सदर कामाचा ठेका देण्यात आला. परंतु, अनेक कामगारांनी सुरुवातीला केवळ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर वेतन बॅँकेत जमाच झाले नसल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, या सफाई कामगारांनी तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला आपली भूमिका चोख बजावली. शाही मिरवणूक मार्ग, साधुग्राम परिसर, कुशावर्त परिसर याठिकाणी सफाई कामगार तैनात ठेवण्यात आले होते. मिरवणूक मार्गावरून एका आखाड्याची मिरवणूक गेल्यानंतर लगेचच दुसरा आखाडा येण्यापूर्वी कामगार रस्ते साफ करत होते. कचऱ्याचे ढीग तातडीने व्हीलबरोजच्या साहाय्याने हलविले जात होते. मिरवणूक मार्गही पाण्याने स्वच्छ केला जात होता. कुशावर्त परिसर पाण्याने दोन वेळा स्वच्छ करण्यात आला. याशिवाय प्रमुख दहाही आखाड्यांमध्ये प्रत्येकी दहा सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वच्छतेच्याबाबत नगरपालिकेकडे फारशा तक्रारी आल्या नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)