शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

नाशिक विभागीय रोजगार, उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची निवड, तर स्वयं रोजगारासाठी 150 उमेदवारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 18:46 IST

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड

ठळक मुद्दे रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड23नामांकित उद्योजक कंपन्यानी नोंदविला सहभाग 749 जागांसाठी 835 उमेदवारांच्या मुलाखती

नाशिक : महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.नाशिक विभागीय कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा याच्या हस्ते झाले. व्यासपीठावर आयटीआयचे प्राचार्य एस. एम. कदम, उपप्राचार्य. एस. एस. भामरे, आयटीआय देवळाचे प्राचार्य चेतन बुरकुल आदि उपस्थित होते. रोजगार मिळविण्यासाठी उपस्थित उमेदवारांना संतोष मंडलेचा यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उमेदवारांनी मोठया कंपनीत नोकरी मिळविण्याचा अट्टाहास न करता मध्यम-छोट्या कंपनीमध्ये नोकरी करून करून कामाचा अनुभव घ्यावा आणि स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी. तर तरुणांनी मिळेल ते काम करण्यास सुरुवात करून अनुभव घेणो आवश्यक आहे. असे काम करण्याच्या अनुभवामुळे बहुआयामी कामाची संधी मिळते, या कामाच्या माध्यमातून मिळणा:या अनुभवातून स्वत:चा विकास करून उद्योजक व्हावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी उपस्थित उमेदवारांना केले. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी प्रत्येकाने आपल्यातील कौशल्याचा शोध घेऊन स्वयंरोजगार करावा आणि नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे  सहायक संचालक मनीष बोरूळकर यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ह्युमन रिसोर्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट सेंटरचे मंगेश भणगे यांनी मुलाखतीचे तंत्र उमेदवारांना समजावून सांगितले. प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता नाशिक विभागाचे उपसंचालक सुनील सैदाने यांनी केले. सूत्रसंचालन रजनी वाघ यांनी केले. सहायक संचालक संपत चाटे यांनी आभार मानले.यावेळी कौशल्य विकास व रोजगार अधिकारी शंकर जाधव, अख्तर तडवी, अशोक चव्हाण, एस. एम. पाटील, संजीवनी नाईकवाडे, बी.जे. जाधव, प्रदीप गावित व अन्य कर्मचारी आणि आयटीआयचे गट निदेशक प्रशांत बडगुजर व सहकारी उपस्थित होते.23 कंपन्यांचा सहभागकौशल्य विकास व रोजगार मेळाव्यात 23नामांकित उद्योजक कंपन्यानी 749 रिक्त जागांसाठी सहभाग नोंदविला होता. यापैकी 18 नियोक्त्यांनी उपस्थित राहून 835 उमेदवारांच्या मुलाखती घेत 595 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. यावेळी खादी ग्रामोद्योग, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अपंग, इतर मागासवर्ग या महामंडळाने दालने लावून माहिती व मार्गदर्शन केले. स्वयंरोजगारासाठी 150 उमेदवारांनी इच्छुक म्हणून नोंदणी केली. महाबँक आरसेटी यांनी उद्योजकता विकास या मोफत प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करून 52 उमेदवारांची नोंदणी केली.

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिकinterviewमुलाखत