शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:29 IST

विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कारवाईचा बडगा उगारला. मोहिमेच्या दुसºया दिवशी हेल्मेट न वापरणाºया ५६७ नाशिककरांवर तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया ७७० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून २ लाख ८३ हजार ५०० रुपये तर अन्य बेशिस्त वाहनचालकांकडून १ लाख ५८ हजार ६०० असा एकूण ४ लाख ४२ हजार १०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

ठळक मुद्देमोहिमेचा दुसरा दिवस : एकूण ४ लाख ४२ हजारांचा दंड वसूल

नाशिक : विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कारवाईचा बडगा उगारला. मोहिमेच्या दुसºया दिवशी हेल्मेट न वापरणाºया ५६७ नाशिककरांवर तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया ७७० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून २ लाख ८३ हजार ५०० रुपये तर अन्य बेशिस्त वाहनचालकांकडून १ लाख ५८ हजार ६०० असा एकूण ४ लाख ४२ हजार १०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणाºया अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात २६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या पाच तासांत हेल्मेट न वापरणाºया ९४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करत ४ लाख ७२ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला होता, तर सीट बेल्टपासून विविध प्रकारे वाहतूक नियमांच्या उल्लंघनापोटी १ लाख ८ हजार ५०० रुपये बेशिस्त नाशिककरांनी पोलिसांकडे जमा केले होते.कारवाईचा आकडा घसरलाकारवाईचा धसका घेत दुसºया दिवशी विना हेल्मेट दुचाकी चालविणाºयांचे प्रमाण शहरातील रस्त्यांवर कमी प्रमाणात दिसून आल्याचा दावा पोलिसांनी केला. पहिल्या दिवशी साडेनऊशे दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्याचे दिसून आले, मात्र मंगळवारी हे प्रमाण घसरले. साडेपाचशे हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना कारवाईला सामोरे जावे लागले. या दोन दिवसांमध्ये ५ लाख ९७ हजार ७०० रुपयांची दंड आकारणी बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी केली आहे.जनजागृतीचा प्रभावहेल्मेटविषयक झालेल्या जनजागृतीचा प्रभाव नाशिककरांमध्ये दुसºया दिवशी चांगल्या प्रमाणात पहावयास मिळाला. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट, सीट बेल्ट सक्तीच्या तपासणी मोहिमेत शहरातील सुमारे पंधराहून अधिक स्वयंसेवी संघटनांनी सहभाग घेतला आहे. या संस्थांच्या स्वयंसेवकांकडून जनप्रबोधनपर फलक घेऊन नाकाबंदीच्या पॉइंटवर जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी