शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

५४ लाखांची फसवणूक : खोडे कुटुंबियांच्या जमीनीचा परस्पर व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:51 IST

जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

ठळक मुद्देजागेची बनावट कागदपत्रे तयार केलीखोटी कागदपत्रे संशयिताने ती खरी असल्याचे भासवून खरेदी खत

नाशिक : खोडे कुटुंबातील पाच व्यक्तींच्या नावे असलेल्या वडाळागावातील जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करत बनावट कागदपत्रांचा आधार घेत एका भामट्याने १६ गुंठे जमीन परस्पर ५४ लाख रुपयांत विक्री करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित मुक्ताजी ऊर्फ मुकेश सखाराम (रा. मैथिली सोसायटी, मुंबईनाका) गुंजाळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. गुंजाळ याने वडाळागावातील खोडेनगर परिसरातील रहिवासी विलास ऊर्फ बाळू जगन्नाथ खोडे, कारभारी विठोबा खोडे, दत्तू कारभारी खोडे, वत्सलाबाई जगन्नाथ खोडे, विजया बाजीराव खोडे, योगेश बाबूराव खोडे यांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ९/१ ते ९/९/१ (अ) क्षेत्रातील ०.१६.५ आर क्षेत्रातील वरील जागेची बनावट कागदपत्रे तयार केली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट भूमिअभिलेख कार्यालयाचा भाग अर्ज नमुना १२ व ७/१२चा फेरफार उतारा तयार केला. ही सर्व खोटी कागदपत्रे बनविल्यावर संशयिताने ती खरी असल्याचे भासवून वरील जमिनीचे खरेदी खत दिनांक २६जुलै २०१३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले. मन्सुरी यांच्याकडून ५४ लाख रु पये भरून घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, कालांतराने फसवणूक झाल्याचा हा प्रकार मन्सुरी यांच्या लक्षात आला. त्यानुसार त्यांनी संशियत मुक्ताजी गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली, तसेच त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित गुंजाळने त्यांना दाद दिली नाही. त्यांनी याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार गुंजाळवर फसवणुकीसह बनावट कागदपत्रे बनवून ती सरकारी कार्यालयात सादर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळ फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय