शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाईक संस्थेसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 14:44 IST

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक  सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थेच्या मुख्यालयातील तीनही इमारतींमधील ३९ बूथवर मतदानासाठी मतदारांच्या रागां लागलेल्या दिसून येत आहे. 

ठळक मुद्देनाईक संस्थेच्या मतदानासाठी सभासदांची गर्दीदुपारपर्यंत 50 टक्के मतदारांनी बजावला हक्क किरकोळ कुरुबुरी वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक  सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थेच्या मुख्यालयातील तीनही इमारतींमधील ३९ बूथवर मतदानासाठी मतदारांच्या रागां लागलेल्या दिसून येत आहे. नाईक शिक्षण संस्थेचे एकून ८ हजार ६९४ सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवाला आहे. नाईक महाविद्यालयातील तीन इमारतींमधील ३९ बुथवर ४०० मतदान कर्मचारी व १०० मदतनिसांच्या माध्यमातून ही मतदानप्रक्रिया राबविली जात आहे.  संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण २९ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात असून या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनल व विरोधकांच्या क्रांतीपॅनलमध्ये चुरशीची लढत सुरू असून दोन्ही गटांक डून मतदांना मतदान केंद्रापर्यंत आणून अधिकाधिक मतदान करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, तर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे कार्यक र्ते महाविद्यालयांच्या प्रांगणात आणि आवारात जमून मतदारांना आपल्या उमेदवाराच्या चिन्हाविषयी माहिती करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्साहाच्या भरात काही कार्यकर्ते मतदार केंद्रांच्या आवारात शिरकाव करीत असल्याने पोलिसांकडून त्यांना नियमित बाहेर काढण्याचे काम सुरू असून या प्रकारात काही ठिकामी कार्यकर्ते आणि उमेदवारांकजून कुरबूर होत असली तर निवडणूक मंडळाचे सदस्य व पोलीस यंत्रणेच्या साह्याने अशा प्रकार नियंत्रित करून सबंधितांना बाहेर काढले जात आहे. दरम्यान. मतदान प्रक्रियेला  सकाळी ७ वाजापासून सुरूवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदारांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सहचिटणीस पदासाठी प्रत्येकी एक मतदान करता येणार आहे, तर विश्वस्त गटासाठी सहा उमेदवारांना मतदान करता येणार आहे. नाशिक गटात चार उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मतदारांना असेल, तर सिन्नर गटात तीन, निफाड-चांदवड गटात तीन,  येवला-मालेगाव गटात दोन, नांदगाव, बागलाण व कळवण गटात दोन उमेदवारांना मतदान करता येणार आहे. स्त्री राखीव गटात दोन उमेदवारांना सभासदांना मतदान करता येणार आहे. असे एकूण २९ उमेदवार या निवडणुकीतून निवडण्यासाठी दिवसभरात ८ हजार ६९४ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकVasantrao Naikवसंतराव नाईकElectionनिवडणूकcollegeमहाविद्यालय